परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली. मागील काही दिवसांपासून राज्याला परतीच्या पावसानं झोडपल्यानं पिकांचं नुकसान झालं आहे. लवकरात लवकर सर्व भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, असंही सत्तारांनी म्हटलंय.